यापुढे कार्यक्रमांवरही सरकारचे नियंत्रण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

मुंबई - खासगी दूरचित्रवाणीबरोबरच एफ. एम. रेडिओ केंद्र आणि कम्युनिटी रेडिओवरून प्रसिद्ध होणाऱ्या कार्यक्रमांवर यापुढे सरकार नियंत्रण ठेवणार आहे. त्यासाठी माहिती व जनसंपर्क सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची स्थापना केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार ही समिती स्थापन केल्याचे सरकारी आदेशात स्पष्ट केले आहे

ही समिती खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या, एफ. एम. रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून होणाऱ्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) कायदा 1995 नुसार राज्यस्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. सरकारने पहिल्यांदाच खासगी दूरचित्रवाहिन्या आणि एफएम रेडिओवरील कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. प्रसिद्ध होणाऱ्या कार्यक्रमांमधून धार्मिक भावना दुखावल्या जात असतील, समूहांमध्ये वाद निर्माण होत असतील किंवा महिलांविषयी अश्‍लील टिप्पणी होत असतील, तर या समितीकडे तक्रार करता येणार आहे. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन पातळ्यांवर ही समिती काम करणार आहे.

Web Title: event government control