ड्रग्स प्रकरण : करिश्मा प्रकाशची सलग दुसऱ्या दिवशीही NCB मार्फत कसून चौकशी

अनिश पाटील
Thursday, 5 November 2020

एनसीबीने गेल्या आठवड्यात करिश्माच्या वर्सोवा येथील घरात शोध मोहिम राबवली होती

मुंबई : अभिनेत्री दिपीका पदुकोणच्या मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरात अंमली पदार्थ सापडल्यानंतर आता केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) सलग दुस-या दिवशी चौकशी केली. करिश्मा दुपारी 12 च्या सुमारास एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली होती.

एनसीबीने बुधवारी सहा तास तिची चौकशी केली होती. तिचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया बुधवारी अपूर्ण राहिल्यामुळे गुरूवारीही तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. शुक्रवारीही तिची चौकशी करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज केलेल्या करिश्माने न्यायालयाला आपण केंद्रीय यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार असल्याचे मंगळवारी सांगितले होते.

महत्त्वाची बातमी : कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई

एनसीबीने गेल्या आठवड्यात करिश्माच्या वर्सोवा येथील घरात शोध मोहिम राबवली होती. तेव्हा त्यांना काही अंमली पदार्थ सापडले. कमी प्रमाणात हे ड्रग्स असल्यामुळे तिला समन्स पाठवून चौकशीसाठी कार्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. रिया चक्रवर्तीला अटक केल्या गुन्ह्यांत एनसीबीने एका ड्रग्स पेडलरला अटक केली होती. त्याच्या चौकशीनंतर करिश्माच्या घरी शोध मोहिम राबवण्यात आली. त्यावेळी ती घरी उपस्थित नव्हती. त्यावेळी तिला समन्स पाठवून चौकशीला बोलवण्यात आले होते. त्यावेळी ती गैरहजर राहिली होती.

अधिक वाचाः  मुख्यमंत्र्यांकडून संयम कसा बाळगावा हे शिकलो: आदित्य ठाकरे

त्यानंतर रविवारी एनसीबीने करिश्मा प्रकाशला पुन्हा समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी करिश्माने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणापूर्वी करिश्मा आणि दिपिका पदुकोण यांच्यातील एक संशयीत चॅटही एनसीबीच्या हाती लागला होता. करिश्मा प्रकाशसोबत 2017 मध्ये झालेल्या चॅटवरून एनसीबीने दिपीकाची पाच तास चौकशी केली होती. 

( संपादन - सुमित बागुल )

ex manager of deepika padukon karishma prakash interrogated by NCB on second consecutive day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex manager of deepika padukon karishma prakash interrogated by NCB on second consecutive day