माजी आमदाराची घरवापसी; येवल्यात भुजबळांना देणार टक्कर?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज शिवसेनाप्रमुख उध्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी केली. 

मुंबई : माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज शिवसेनाप्रमुख उध्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी केली. 

मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.

कल्याणराव पाटील हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून येवला मतदार संघात विद्यमान आमदार छगन भूजबळ यांना ते जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. तसेच, कल्याण पाटील यांच्या प्रवेशाने आता छगन भूजबळ यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावर प्रश्नंचिन्ह उपस्थित झाले असून ते प्रवेश करणार नाहीत हे जवळपास नक्की झाल्याचं बोललं जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex MLA kalyanrao patil enter in Shivsena