बेकायदा पार्किंगवर सैनिकांचा वॉच

file photo
file photo

मुंबई : महानगरपालिकेने मुंबईतील "बेस्ट' आगारांच्या 50 मीटर परिसरात, तसेच पाच प्रमुख रस्त्यांवरील काही भागांत "नो पार्किंग झोन' जाहीर केल्यानंतर शुक्रवारी, पहिल्या दिवशीच 28 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहनमालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने होणाऱ्या या कारवाईसाठी महापालिकेने माजी सैनिकांचे पथक नियुक्त केले आहे.

पालिकेने जुलै महिन्यापासून रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. प्रारंभी सार्वजनिक वाहनतळांच्या 50 मीटर परिसरातील वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर बेस्ट आगारांच्या परिसरात तसेच पाच प्रमुख रस्त्यांवरील काही भागांत बेकायदा पार्किंगवर निर्बंध आणण्यात आले.

या कारवाईस शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 28 गाड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी आठ वाहनमालकांकडून 65 हजारांचा दंड वसूल करून गाड्या सोडण्यात आल्या आहेत. इतर 20 वाहने अद्याप पालिकेच्या ताब्यात आहेत. महापालिकेने जुलै महिन्यापासून बेकायदा पार्किंगसाठीचा दंड दोन हजारांपासून 10 हजार रुपयांपर्यंत वाढवला आहे. वाहन "टो' करण्याचाही खर्च मालकाकडून वसूल केला जातो. 
.... 
मार्ग ... झालेली कारवाई 
दक्षिण मुंबई (महर्षी कर्वे मार्ग) ः 24 वाहने जप्त, आठ वाहने सोडली, 65 हजारांचा दंड वसूल 
अंधेरी (पश्‍चिम) स्वामी विवेकानंद मार्ग ः दोन वाहने जप्त 
भांडुप (लाल बहादूर शास्त्री मार्ग) ः 2 वाहने जप्त 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com