आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धा

अच्युत पाटील
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

बोर्डी - कृषी विज्ञान केंद्र कोसबाड ता. डहाणू येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.8 आगस्ट रोजी  सकाळी 10 ते दुपारी पाच वाजता पर्यंत विविध रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

बोर्डी - कृषी विज्ञान केंद्र कोसबाड ता. डहाणू येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.8 आगस्ट रोजी  सकाळी 10 ते दुपारी पाच वाजता पर्यंत विविध रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

तरी तमाम शेतकरी बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की हे प्रदर्शन व पाक कला स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे. 
पाककृती स्पर्धे मध्ये भाग देण्याकरिता नियम:
१. स्पर्धेत कोणत्याही जिल्ह्यातील युवक युवती तसेच स्त्री पुरुषांना भाग घेता येईल.
२. स्पर्धेत भाग घेण्याकरिता ६ आगस्ट पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
३. नोंदणी करताना आपण स्पर्धेकरिता निवड केलेली रानभाजी व पाककृतींची पद्धती लिखित स्वरूपात देणे आवश्यक आहे.
४. स्पर्धेकरिता रानभाजी पाककृती आपल्या घरी बनवून पूर्ण तयार स्वरूपात आणावी लागेल*
५. एका स्पर्धकाने एकच प्रकारची रानभाजी पाककृती करून आणावी.
६. स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता कोणतेही शुल्क नाही.
७. स्पर्धेमधून तज्ञ समितीच्या निरीक्षणातून अंतिम पाच चांगल्या पाककृतींची निवड केली जाईल व त्यांना बक्षिसे व पारितोषिके दिली जातील. इतर सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ सर्टिफिकेट दिले जाईल*
८.स्पर्धेचे नियम व अटी सर्व स्पर्धकांना बंधनकारक असतील.
९. तज्ञ समितीने दिलेला अंतिम निर्णय सर्व स्पर्धकांना बंधनकारक असेल.
१०. नोंदणी कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे करायची आहे

संपर्क: प्रा. रुपाली देशमुख (गृह विज्ञान तज्ञ)
मो. 8698701177
प्रा. विलास जाधव (प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड)
मो. 9673730858

Web Title: exhibition and recipe competition on the tribal day