डोंबिवली - एक्सपिरीया फॅशन वीक 2018 चे आयोजन

संजीत वायंगणकर
मंगळवार, 20 मार्च 2018

डोंबिवली : डोंबिवली जवळील लोढा पलावा सिटी येथील एक्सपिरीया मॉलमध्ये एक्सपिरीया फॅशन वीक 2018 चे आयोजन करण्यात आले होते. फॅशन क्षेत्रातील नामांकित मॉडल्सबरोबर लहान मुलांचा, महिला व पुरुष गटातील स्पर्धकांचा रॅम्प वॉक, फॅशन परेड, पारंपरिक व अत्याधुनिक पेहरावात रॅम्पवॉक अशा वेगवेगळ्या फेऱ्या पार करुन आठ स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. बहुभाषाकांचे वर्चस्व असलेल्या या फॅशन शोच्या अंतिम स्पर्धेत मराठमोळ्या प्रगती कलगुटकरने तिसरा क्रमांक पटकाविला आणि डोंबिवलीकर या प्रांतातही पिछाडीवर नसल्याचे सिध्द केले.

लहान मुलांच्या गटात आर्यन खत्री, भूमिका गुप्ता, शुभ्राशु सिंग, पुरुष गटात रवी सिंग, शारिक खान, देवाशीश चंबिरमानी आणि महिला गटात दिव्यांका अग्रवाल, सृष्टी शेट्टी, प्रगती कलगुटकर या विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. रेखा राना, स्मृती समा, हरप्रीत सिंग, मोहक खुराना यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.

प्राथमिक फेरीत एकूण 2200 स्पर्धक ऑडीशनमध्ये सहभागी झाले. अनेक फेऱ्यांनंतर प्रत्येक गटातील आठ स्पर्धकांना अंतिम साठी निवडण्यात आले. ही अंतिम स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. फॅशन विश्वातील बारा प्रसिद्ध मॉडेल्सने आधुनिक आकर्षक पेहराव परिधान करून रॅम्प वॉकवर दमदार प्रदर्शन केले. प्रगती कलगुटकर हिने आपल्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने अनेक उपस्थितांची मने जिंकली. त्यामुळे प्रेक्षकांडून चीअर्सअप आणि टाळ्यांचा वर्षाव होत होता. अंतिम स्पर्धा पाहण्यासाठी मॉलमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली होती. मॉलमधील नामवंत कंपन्यांच्या आऊटलेट्स कडून या फॅशनवीकसाठी भरघोस सहकार्य करण्यात आले.

Web Title: experia fashion week 2018 organised in dombivali