'तक्रार रद्द करण्याबाबत भूमिका स्पष्ट करा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

मुंबई - पाचशे आणि हजारच्या नोटा बदलून देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या ब्रिटिश नागरिकाविरोधातील तक्रार रद्द करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना आज दिले.

नोटाबंदीनंतर अशा प्रकारच्या तक्रारी येणे वाढू शकतात, त्यामुळे संबंधित ब्रिटिश नागरिकाविरोधातील सर्व कागदपत्रे तपासा, असेही निर्देश न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठाने दिले आहेत. ब्रिटिश नागरिक यासीन सल्या यांच्याविरोधात व्यावसायिक अबूबाकर मणीयार यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. 50 लाख रुपये नव्या चलनात बदलून देण्याचे किंवा बॅंक खात्यात जमा करण्याचे आश्‍वासन आपल्याला सल्या यांनी दिले होते; मात्र त्यांनी ते पाळले नाही, अशी तक्रार मणियार यांनी केली. त्यानंतर पोलिसांनी सल्या यांना अटक करून त्यांच्याकडील पैसेही ताब्यात घेतले. सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तक्रारदार माझे मित्र आहेत; मात्र गैरसमजामुळे त्यांनी तक्रार केली. आता आमच्यामध्ये तडजोड झाली आहे, असे सल्या यांनी याचिकेत म्हटले आहे. पोलिसांनी मात्र याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Web Title: 'Explain the role of a complaint to cancel'