जात वैधतेसाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई - व्यावसायिक अभ्यासक्रमांना 2018-19 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 10 ऑगस्ट 2018 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून त्यामध्ये 14 ऑगस्ट 2018 पर्यंत वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण-फार्म डी., वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग हा पदवी अभ्यासक्रम आणि एमबीए-एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

Web Title: Extension of Caste Validity