Phd प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ; मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध

तेजस वाघमारे
Thursday, 21 January 2021

मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.

मुंबई  : मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी 28 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ज्या इच्छुकांनी फेब्रुवारी आणि मार्च 2020 ला ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज दाखल करण्याची आवश्‍यकता नसून त्यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यास 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार 6512 अर्ज प्राप्त झाले. ज्यात महाराष्ट्रातून 6,051 तर इतर राज्यातून 461 अर्ज प्राप्त झाले होते. विद्याशाखानिहाय वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेसाठी 1148, मानव्यविद्या 1691, आंतरविद्याशाखा 333 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी 3340 एवढे अर्ज प्राप्त झाले होते. तर एमफील प्रवेश परीक्षेसाठी 326 अर्ज प्राप्त झाले होते. ज्यात महाराष्ट्रातून 227 आणि इतर राज्यातून 49 अर्ज प्राप्त झाले.

Extension for Phd entrance exam application Separate link available on Mumbai University website

-----------------------

 ( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extension for Phd entrance exam application Separate link available on Mumbai University website