खंडणी प्रकरणी कुख्यात गुंड एजाज लकडावाला ठाणे पोलिसांच्या ताब्यात

खंडणी प्रकरणी कुख्यात गुंड एजाज लकडावाला ठाणे पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: नोव्हेंबर २०१९ मध्ये कल्याणमधील एका व्यावसायिकाकडून एजाज लकडावालाने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी छोटा राजन याचा हस्तक एजाज लकडावाला याला सोमवारी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले आहे. एजाजला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली. 

कल्याण दुधनाका येथील एका व्यावसायिकाला 11 नोव्हेंबर 2019  मध्ये एजाज लकडावालाने मोबाईलवर मॅसेज पाठवून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर या व्यावसायिकाने याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे, एजाज लकडावाला विरोधात दोन कोटी रुपये खंडणी तसेच धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुख्यात गुंड छोटा राजनचा एजाज लकडावाला हा हस्तक आहे. सुमारे वर्षभरापूर्वी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो तळोजा कारागृहात बंदिस्त आहे. कल्याण येथील व्यावसायिकाकडून खंडणी  मागितल्याप्रकरणी आता ठाणे पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेतले आहे. एजाजची 12 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून त्याने कल्याणमधील व्यावसायिकाकडून कोणासाठी खंडणी मागितली, याचा तपास सुरू पोलिस करीत आहे.

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Extortion Case Gangster Ejaz Lakdawala Anti Extortion Cell Thane Police Takes Custody

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com