शिवसेनेच्या प्रयत्नांनी बोर्डी महाविद्यालयाला प्रथम वर्ष विज्ञान शाखेची वाढीव तुकडी मंजूर

शिवसेनेच्या प्रयत्नांनी बोर्डी महाविद्यालयाला प्रथम वर्ष विज्ञान शाखेची वाढीव तुकडी मंजूर

बोर्डी : 1 सप्टेंबर येथील एन.बी.मेहता महाविद्यालयाला विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाची वाढीव तुकडी मिळावी यासाठी महाविद्यालय स्तरावरुन गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न सुरु होते. परंतु तुकडी मंजूर होत नसल्यामुळे गेल्या वर्षी 72 व यावर्षी 58 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते.

याबाबतची माहिती वंचित विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी यांना दिली असता त्वरीत सेनेचे आमदार तथा जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांच्या सोबत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेऊन याबाबत तपशीलवार माहिती दिली. परिणामी आज प्रथम वर्ष विज्ञान शाखेसाठी वाढीव तुकडी मंजूर करण्यात आली. यामुळे पालकवर्ग आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार तथा पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा यांच्या सहकार्याने सिनेट सद्स्य तसेच स्थानिक सेना पदाधिकाऱ्यांसह आमदार अमित घोडा तालुका प्रमुख संजय कांबळे, वैदेही वाढाण, तुषार पाटील, विठ्ठल पडवळे, सुहास सावे, यतीन सावे, भावेश माच्छी, जयंत माच्छी आदिंनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com