पत्नीसोबत बेडरुममध्ये होता प्रियकर, अचानक पतीला जाग आली अन्...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

अनैतिक प्रेमसंबंधातून आग्रीपाडा परिसरात 20 वर्षीय तरुणाचा नवव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला आहे. प्रेयसीचा पती घरात झोपला असताना तरुण तिला भेटण्यासाठी तिच्या घरात आला होता.

मुंबई : अनैतिक प्रेमसंबंधातून आग्रीपाडा परिसरात 20 वर्षीय तरुणाचा नवव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला आहे. प्रेयसीचा पती घरात झोपला असताना तरुण तिला भेटण्यासाठी तिच्या घरात आला होता.

अचानक पतीला जाग आल्याचे पाहूण तरुणाने तिथून पळ काढला. बेडरुमच्या खिडकीतून तो बाहेर निघाला. नवव्या मजल्यावरून आठव्या मजल्यावर येण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर नायर रोड परिसरात कुटुंबीयांसोबत राहात होता. त्याची विवाहीत प्रेयसी देखील पतीसोबत त्याच बिल्डिंगमध्ये राहत होती. दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते. प्रेयसीचा पती घरात झोपला असताना सागर प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. दोघे घरात असताना अचानक तिच्या पतीला जाग आल्याचे लक्षात येताच सागरने नेहमीप्रमाणे नवव्या मजल्यावरील खिडकीतून आठव्या मजल्यावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि त्याचा जागेवर मृत्यू झाला.

सुरक्षारक्षकाने त्याला रक्तबंभाळ अवस्थेत पाहले. तातडीने त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra marital affairs in mumbai lover died

टॅग्स