BEST Strike ः रेल्वेच्या तिनही मार्गांवर अतिरिक्त सेवा

BEST Strike ः रेल्वेच्या तिनही मार्गांवर अतिरिक्त सेवा

मुंबई : बेस्ट कामगारांचा मध्यरात्रीपासून संप और झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज मेट्रो, रेल्वे, एसटी, ओला, उबर असा वेगळा पर्याय निवडावा लागतो आहे. यामध्ये एसटी, मेट्रोने अतिरिक्त सेवा चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पश्चिम रेल्वेने सहा अतिरिक्त फेऱ्या उपनगरासाठी धावणार असून तुचप्रमाणे मध्य आणि हार्बर मार्गावर प्रत्येकी दोन अशा चार फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

बेस्ट च्या कामगारांच्या संपाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. दैनंदिन बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज प्रवास करताना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. बेस्टच्या संपामुळे अनेकठिकानी रिक्षा, टॅक्सी, लोकल, तर उपनगरातील काहींनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आता, तीनही रेल्वे मार्गांवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहे.

असे असतील रेल्वे सेवा
मध्य रेल्वे

ठाणे दुपारी 1.44 - सिएसएमटी दुपारी 2.40 
सीएसएमटी दु. 2.49 - कल्याण दुपारी 4.15 

हार्बर रेल्वे
वाशी दुपारी 1.44 - सिएसएमटी दुपारी 2.32
सिएसएमटी दुपारी 2.45 - पनवेल दुपारी 4.5 

पश्चिम रेल्वे 
जलद मार्गावर
चर्चगेट दुपारी 12.45 - बोरीवली दुपारी 13.35
बोरीवली दुपारी 13.51 - चर्चगेट दुपारी 2.30
धीम्या मार्गावर
चर्चगेट दुपारी 2.23 - अंधेरी दुपारी 3.8
अंधेरी दुपारी 3.18 - चर्चगेट दुपारी 4.1 
धीम्या मार्गावर
चर्चगेट दुपारी 3.13 - गोरेगाव दुपारी 4.5 
गोरेगाव दुपारी 4.12 - चर्चेगेट सायंकाळी 5.17

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com