पुष्पाबेन नहार यांचे नेत्रदान

अच्युत पाटील
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

​उल्लेखनीय बाब म्हणजे पुष्पाबेन यांचे सासरे केवळचंद लालचंद नहार यांच्या इच्छेनुसार 2002 साली मृत्यू नंतर नेत्रदान करण्यात आले होते. नेत्रदान करणारे या कुटुंबाच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.

बोर्डी - येथील जैन समाजातील महिला पुष्पाबेन चंद्रकांत नहार (69) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा राकेश उर्फ पिंकी आणि मुलगी अर्चना उर्फ गुड्डी असा परिवार आहे. पुष्पाबेन यांनी मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे गुजरात राज्यातील वापी येथील रेन्बो हॉस्पिटलमध्ये नेत्रदान करण्यात आले.

उल्लेखनीय बाब म्हणजे पुष्पाबेन यांचे सासरे केवळचंद लालचंद नहार यांच्या इच्छेनुसार 2002 साली मृत्यूनंतर नेत्रदान करण्यात आले होते. नेत्रदान करणारे या कुटुंबाच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे.

पती चंद्रकात नहार यांच्या अकाली निधनानंतर पुष्पाबेन यांनी दोन लहान मुलांचा सांभाळ करत धार्मिक कार्याला वाहून घेतले होते. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होवुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. मागील आठ दिवसापुर्वी प्रकृती बिघडल्याने वापी येथील रेन्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवार दिनांक 26 ला रात्री पुष्पाबेन यांची प्राणज्योत मालवली.

Web Title: Eye Donation by Pushpaben Nahar