फेसबुकवर मैत्री करणे शिक्षिकेला महागात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

मुंबई - फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ना. म. जोशी मार्ग परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेला महागात पडले. या मित्राने शिक्षिकेला भेटवस्तू पाठवल्याचे सांगत विविध कारणावरून तब्बल 68 हजार उकळले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

मुंबई - फेसबुकवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ना. म. जोशी मार्ग परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेला महागात पडले. या मित्राने शिक्षिकेला भेटवस्तू पाठवल्याचे सांगत विविध कारणावरून तब्बल 68 हजार उकळले. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

प्रणाली (नाव बदललेले आहे) या वरळी येथील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करतात. सप्टेंबर महिन्यात त्यांना फेसबुकवर अरविंद कुमार नावाच्या व्यक्तीची मैत्रीसाठी विनंती आली होती. ती स्वीकारल्यानंतर दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अरविंदने प्रणालीला अमेरिकन नेव्हीत कॅप्टन पदावर असल्याचे सांगितले होते. तसेच सध्या अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेसोबत पोलंडला आला असल्याचे सांगितले. काही महिन्यांनंतर अरविंदने पोलंडमधून प्रणालीला भेटवस्तू पाठवायचे असल्याचे सांगत तिचा मोबाईल नंबर घेतला. त्या वेळी प्रणालीच्या व्हॉट्‌स ऍपवर अरविंदरने सोन्याच्या नेकलेसचा फोटो पाठवून ती भेटवस्तू असल्याचे सांगितले. 12 ऑक्‍टोबरला प्रणालीला फोन करून एका दिल्लीतील महिलेने पार्सल आल्याचे सांगत त्यासाठी 68 हजार सीमा शुल्क भरावे लागेल असे सांगितले. 

त्या वेळी प्रणालीने महिलेने दिलेल्या अकाऊंटवर 68 हजार 500 रुपये पाठवले. त्यानंतर त्या भेटवस्तूमध्ये काही विदेशी चलन आढळून आल्याने तुम्हाला त्याचा दंड म्हणून दोन लाख भरावे लागतील, असे त्या महिलेने सांगितले. दंड न भरल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते, असेही सांगितले. याबाबत अरविंदला दूरध्वनीवरून विचारले असता त्यानेही खर्चासाठी 30 हजार डॉलर पाठवल्याचे सांगितले. संबंधित महिलेवर संशय आल्याने प्रणालीने फोर्टमधील बॅलार्ड इस्टेट सीमा शुल्क कार्यालयाला भेट देऊन पार्सलबाबत चौकशी केली; मात्र फसणवूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिने थेट पोलिसांत तक्रार केली.

Web Title: Facebook unidentified person friendship

टॅग्स