Fact Check : किम जोंग ऊन करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

बघता बघता हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या फोटोला सर्व स्तरातून शेकडो हजारो लाईक्स मिळाले आणि  शेकडो लोकांनी हा फोटो शेअर केला. मात्र या फोटोमध्ये किती सत्यता आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडिया वापरण्याकडे लोकांचा प्रचंड कल दिसून येतोय. त्यामुळे सोशल मीडियावरून काही आपत्तीजनक पोस्ट किंवा व्हिडीओज शेअर केले जात आहेत. विशेष म्हणजे असे फोटो किंवा व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडिया आणि फेसबुकवर व्हायरल होतोय.

या व्हायरल फोटोमध्ये उत्तर कोरियाचा तानाशाह किम जोंग ऊन चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतो आहे असं दाखवण्यात आलंय. हा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी पोस्ट करण्यात आला होता. या फोटोमध्ये किम जोंग ऊन बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्त्यानं त्यांच्या पुतळ्यापुढे बसून त्यांना पुष्पांजली अपर्ण करत आहे असं दाखवण्यात आलं होतं. 'ज्या किम जोंग पुढे संपूर्ण जग झुकतं, तो बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाला आहे, असं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय.

कोरोनाच्या ८३ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मग काय आहेत यामागची कारणं ? जाणून घ्या...

बघता बघता हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या फोटोला सर्व स्तरातून शेकडो हजारो लाईक्स मिळाले आणि  शेकडो लोकांनी हा फोटो शेअर केला. मात्र या फोटोमध्ये किती सत्यता आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

काय आहे या फोटो मागचं सत्य:

किम जोंग ऊनचा हा बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याचा फोटो खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.  हा फोटो फोटोशॉपच्या मदतीनं बनवण्यात आला आहे. खऱ्या फोटोमध्ये किम जोंग ऊन जपानच्या काही  संतांना अभिवादन करतो आहे. 'Inter-Religious Federation for World Peace' या वेबसाईट हा खरा फोटो पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळे हा व्हरल फोटो खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

३ मे नंतर काय होऊ शकतं ? दुसऱ्या लॉक डाऊन नंतर तिसरा लॉक डाऊन ?
 

Image may contain: one or more people, people standing, outdoor and text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fact check kim jong un is praying dr babasaheb ambedkar see what is reality