'कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी'; भेटीबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

तुषार सोनवणे | Sunday, 27 September 2020

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीबाबत स्वतः फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीबाबत स्वतः फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक'; राऊत-फडणवीस भेटींवर कॉंग्रेसनेत्याची खोचक टीका

महाविकास आघाडी स्थापन करण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे. असे संजय राऊत यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणे ही राजकीय दृष्ट्या महत्वाची घटना आहे. त्यामुळे या भेटीबाबत मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चांना उधान आले आहे.परंतु देवेंद्र फडणवीस यांनीच याविषयी खुलासा केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “शिवेसेनेच्या सामना दैनिकासाठी माझी मुलाखत घेण्याची संजय राऊत यांची इच्छा आहे. याच मुलाखतीसंदर्भात आमची बैठक झाली. या मुलाखतीसंदर्भात मी त्यांनी काही अटी घातल्या होत्या. त्यासाठीच भेट झाली. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. कुठलाही भाग न वगळता मुलाखत प्रसिद्ध करण्यात यावी, अशी अट मी त्यांना घातली होती,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.