रेल्वेतील गुन्ह्यांना आळा घालण्यात अपयश 

file photo
file photo

मुंबई : राज्यातील रेल्वे पोलिसांत देशातील सर्वाधिक म्हणजे 34 हजार 76 गुन्हे दाखल झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवाल विभागाच्या (एनसीआरबी) 2017 च्या अहवालातून समोर आले आहे. गंभीर बाब म्हणजे यातील 31 हजार 857 गुन्हे हे फक्त चोरीचे आहेत.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार राज्यातील रेल्वे पोलिसांकडे 2015 व 2016 मध्ये अनुक्रमे 7556 व 7684 गुन्हे दाखल होते. त्यात 2017 मध्ये चार पटींनी वाढ होऊन हा आकडा 34 हजार 76 वर पोहोचला आहे. त्यातील तब्बल 93 टक्के गुन्हे हे फक्त चोरीचे आहेत.

याशिवाय 608 जबरी चोरीचे गुन्हे राज्यातील रेल्वेत घडले आहेत. त्यामुळे मुंबई व परिसरातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेतील चोरट्यांना आळा घालण्याची आवश्‍यकता आहे. याशिवाय राज्यातील रेल्वे पोलिसांकडे 23 बाल लैंगिक अत्याचार संरक्षक (पोक्‍सो) गुन्हेही दाखल झाले आहेत. याशिवाय राज्य रेल्वे पोलिसांकडे 9 हत्या, 11 हत्येचा प्रयत्न, 156 मारहाण, 117 विनयभंग, 63 अपहरण अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे, पण चोरीच्या गुन्ह्यांच्या तुलनेत गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यात रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. 

फटका गॅंगची दहशत 
जानेवारी ते जून 2019 पर्यंत फटका गॅंगने डल्ला मारल्याच्या 281 घटना घडल्या आहेत. यामध्ये वडाळा हद्दीत सर्वाधिक 52 घटना आहेत. वडाळा ते जीटीबी नगरदरम्यान 25 आणि किंग्ज सर्कल ते वडाळादरम्यान 12 घटना घडल्याची माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाने दिली. त्यापाठोपाठ शिवडी ते वडाळा, कुर्ला ते चुनाभट्टीदरम्यानही घटनांची नोंद झाली आहे; तर कल्याण हद्दीत 50 घटना घडल्या असून यामध्ये कल्याण ते विठ्ठलवाडीदरम्यान सर्वाधिक 18 घटनांची नोंद असल्याचे सांगितले. पत्रीपूल ते कल्याण, ठाकुर्ली ते कल्याण, कल्याण ते शहाड यासह अन्य भागांतही मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत. ठाणे ते ऐरोली दरम्यानही 14 घटना असून विटावा पूल आणि मुकंद कंपनीजवळील भाग हा धोक्‍याचा असल्याचे सांगण्यात आले. ठाणे ते दिवादरम्यानही पारसिक बोगदा, खाडी पूल, कळवा ते मुंब्रा, ठाणे ते ऐरोली भाग हे लोकल प्रवासासाठी धोकादायक आहेत. या हद्दीत 34 घटनांची नोंद झाली असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. 

गर्दुल्ले व अमली पदार्थ तस्करांवरही कारवाई 
राज्यातील रेल्वे पोलिसांनी 494 गुन्हे गर्दुल्ले व अमली पदार्थ तस्करांविरोधात दाखल केले आहेत. अशा गर्दुल्ल्यांविरोधातही रेल्वे पोलिस विशेष मोहीम राबवत आहेत. 
 

रेल्वे सुरक्षा दलाकडेही सर्वाधिक गुन्हे 
राज्यातील रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा दलामध्येही 2017 मध्ये सर्वाधिक म्हणजे दोन लाख 34 हजार 826 गुन्हे दाखल झाले. त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशात एक लाख 37 हजार 693 गुन्हे दाखल झाले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com