२ हजार ८९२ कोटींचं कर्ज, अनिल अंबानींचं रिलायन्स मुख्यालय येस बँक घेणार ताब्यात

२ हजार ८९२ कोटींचं कर्ज, अनिल अंबानींचं रिलायन्स मुख्यालय येस बँक घेणार ताब्यात

मुंबई - अनिल धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुप या कंपनीने येस बँकेचं २ हजार ८९२ कोटींचं कर्ज न चुकवल्याने येस बँकेने आता मोठं पाऊल उचललं आहे. येस बँक अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स ग्रुप कंपनीचं मुंबईतील मुख्यालय आता जप्त करणार आहे. रिलायन्स ग्रुप कंपनीचं मुंबईमधील सांताक्रुज भागात मुख्यालय आहे. 

एकेकाळी रिलायन्स आणि येस बँक दोघांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. मात्र आता विविध प्रकरणांमुळे दोन्ही कंपन्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. म्हणूनच आता कर्ज बुडवेगिरी प्रकरणात येस बँकेने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुप विरोधात मोठी कारवाई केलीये. बँकेने रिलायन्सच्या सांताक्रुजमधील मुख्यालयात 'नोटीस ऑफ पझेशन' पाठवली आहे. रिलायन्स ग्रुपच्या मुख्य कार्यालयाव्यतिरिक्त बँकेने दक्षिण मुंबईतील रिलायन्सच्या इतरही ऑफिसेसला अशा प्रकारची नोटीस धाडली आहे.  

'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर'वर आहे कर्ज 

येस बँकेने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला २ हजार ८९२ कोटींचं कर्ज दिलं होतं. दरम्यान आज उचलण्यात आलेलं कारवाईचं पाऊल याच कर्जासंबंधात आहे. येस बँकेची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे बँकेकडून त्यांच्यावर असलेल्या 'बॅड लोन' चा दबाव कमी करण्याचा प्रयत्न होतोय. अनिल अंबानी यांच्यावर सुमारे 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. दरम्यान, याबाबत बोलताना येस बँकेने अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीला ६० दिवसांची नोटीसही बजावली असल्याचं म्हटलंय.

बँकेच्या नोटिशीची मुदत संपलीये.  अशात अनिल अंबानी हे रिलायन्सवरील कर्ज फेडण्यास असफल राहिल्यानंतर आता SARFAESI Act 2002 अंतर्गत बँकेकडून हे मोठं पाऊल उचलण्यात आलंय. 

Failure to repay Rs 2892 crore Yes Bank to seize Anil Ambanis group HQ in Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com