बनावट नोटांचा मुंबईत सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

मुंबई - शहरात बनावट नोटा आणणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. सात महिन्यांत 10 लाख 54 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 19 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबई - शहरात बनावट नोटा आणणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. सात महिन्यांत 10 लाख 54 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. 19 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पाकिस्तान, नेपाळ येथून आलेल्या या बनावट नोटा पश्‍चिम बंगाल, बिहारमार्गे मुंबईत आणल्या जातात. त्या चलनात मिसळण्यासाठी काही तस्करांना पैसे दिले जातात. हे तस्कर त्यांच्या विश्‍वासू व्यक्तींना या नोटा पाठवतात. तीन लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात पाच लाखांच्या बनावट नोटा, असे या काळ्या धंद्याचे सूत्र असते. अशा तस्करांवर मुंबई पोलिस लक्ष ठेवतात. मुंबईत सात महिन्यांत असे 10 गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी यंदा फेब्रुवारीत बनावट नोटांच्या तस्करीचे चार गुन्हे दाखल केले. गुन्हे प्रकटीकरण कक्ष-3ने तीन लाखांच्या नोटा जप्त केल्या होत्या. जूनमध्ये जोगेश्‍वरी पोलिसांनी बॅंकेत बनावट नोटा जमा करणाऱ्याला अटक केली. या आरोपीला कचराकुंडीजवळ पैशांची बॅग सापडली होती. कर्ज झाल्याने तो त्रस्त होता. हे पैसे त्याने नातेवाइकाच्या बॅंक खात्यात जमा केले होते. मात्र, त्या नोटा बनावट असल्याचे बॅंकेच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. 

Web Title: fake currency in Mumbai