कौमार्यत्व पटवून देणाऱ्या 'व्हर्जिनिटी कॅप्सूल'चा सुळसुळाट

 वैदेही काणेकर
Wednesday, 20 November 2019

  • कौमार्य सिद्ध करणाऱ्या फसव्या गोळ्यांची विक्री
  • वेबसाईटच्या माध्यमातून केली जातीये फसवणूक
  • फसव्या जाहिरातीतून गैरसमजुतींना खतपाणी 

कौमार्य सिद्ध करणाऱ्या फसव्या गोळ्यांची सध्या बाजारात सर्रास विक्री सुरूंय. विशेष म्हणजे समाजातल्या गैरसमजुतीतून या गोळ्यांची खरेदीही केली जातेय. मात्र अनेक महिलांनी याला कडाडून विरोध केलाय. 

पहिल्या शरीरसंबंधांनंतर स्त्रीच्या जननमार्गातून रक्तस्राव होतो, ही संकल्पना अवैज्ञानिक असल्याचं सिद्ध झालेलं असतानाही लग्नानंतर कौमार्यत्व पटवून देणाऱ्या व्हर्जिनिटी कॅप्सूलचा सुळसुळाट झालाय. या गोळ्यांची सर्रास ऑनलाइन विक्री सुरूंय. त्यामुळे स्त्रीच्या कौमार्याविषयी समाजात आधीच असलेल्या गैरसमजुतींना या फसव्या गोळ्यांच्या मार्गानं आणखी खतपाणी घातलं जातंय. 

कौमार्यभंग झालेलं नाही हे सिद्ध करणारी ‘हायमेनोप्लास्टी’सारखी शस्त्रक्रिया खर्चीक असल्यानं स्वस्तातला पर्याय म्हणून ‘व्हर्जिनिटी कॅप्सूल्स’ची जाहिरात केली जातीय. नामांकित संकेतस्थळांवर साडेतीनशे रुपयांपासून ते अगदी तीन हजार रुपयांपर्यंत या गोळ्या विकल्या जातात. शिवाय गोपनीयता बाळगण्यासाठी थेट घरपोच देण्याची व्यवस्था केली जाते. 

या गोळ्यांची निर्मिती परदेशात होते आणि वेबसाईटच्या माधमातून विक्री होत असल्यानं त्यावर कुणाचेही निर्बंध नाहीत. 

काय आहे कॅप्सूल उप्तादक कंपन्यांचा दावा ?

विवाहानंतर शरीरसंबंध करण्याआधी ही गोळी जननमार्गामधून कृत्रिम रक्तस्रावासाठी  वापरली जाते. या गोळ्यांमुळे योनीमार्गातून रक्तस्राव होत असल्याचं या गोळ्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलंय. हा रक्तस्राव पूर्णपणे नैसर्गिक भासत असल्याचा दावाही जाहिरातींमधून करण्यात येतोय.  

अशा प्रकारे गोळ्यांची विक्री करणं म्हणजे मानसिक विकृत्ती असल्याचा आरोप अनेक महिलांनी केलाय. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याऐवजी कुणी या गैरसमजूतींना खतपणी घालत असेल तर अशा अपप्रवृत्तींना वेळीच ठेचायला हवं.

Webtitle : fake hymen pills are freely sold online


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fake hymen pills are freely sold online