भिवंडीत बनावट माव्याचा डाव उधळला

कारवाईदरम्यान आढळून आलेला बनावट मावा.
कारवाईदरम्यान आढळून आलेला बनावट मावा.

भिवंडी : भिवंडीत बनावट मावा बनवणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने धाड टाकत तब्बल दोन लाख रुपये किमतीचा मावा व चायनीज सॉस जप्त केला आहे; मात्र या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी (ता. २६) लोनाड-हरणापाडा येथील एमएम फूड्‌स या विनापरवाना सुरू असलेल्या कंपनीवर ही धाड टाकण्यात आली.
 
लोनाड हरणा पाडा येथे एम. एम. फूड्‌स ही कंपनी विनापरवाना सुरू असल्याची तक्रार अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव यांच्याकडे येताच त्यांनी पथकाचे शंकर राठोड यांना सोबत घेऊन या कंपनीवर छापा मारला असता त्याना कंपनीकडे कोणताही सरकारी परवाना आढळून आला नाही. 


त्या ठिकाणी दूध पावडर, डाळडा व साखर यांच्या मिश्रणातून हलक्‍या प्रतीचा बनावट मावा बनविला जात असल्याचे व बाजारात बर्फी या ब्रॅंडने तो प्रतिकिलो १२५ रुपये दराने विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच चायनीज खाद्य पदार्थात हमखास आढळणारे डार्क सोया सॉस व रेड चिली सॉसचे उत्पादनही या ठिकाणी सुरू असल्याचे आढळले.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापक सत्येंद्र रणजित सिंग यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता ते दाखवू न शकल्याने या कंपनीतून ७५० किलो मावा (९३ हजार ७५० रु.), डार्क सॉस २७० किलो (३० हजार ६०० रुपये) व रेड चिली सॉस ४५० किलो ( ५४ हजार रुपये) असा एकूण एक लाख ७८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत कंपनीस सील केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com