कळव्यात साडे दहा लाखाच्या बनावट नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कळवा गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, एकाला अटक

कळवा: कळव्यातील कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर रविवारी (दि 18 ला )रात्री दीड च्या सुमारास सापळा रचून कळवा पोलिसांनी बनावट नोटा बाळगणाऱ्या मुंब्रा येथील तरुणाला अटक केली व त्याच्या कडून 10 लाख 74 हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या.

रविवारी रात्री दीडच्या सुमारास मुंब्रा येथील दशरथ भोलू श्रीनिवास (36)हा कळवा नाका येथे 2000 रु सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती कळवा गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार रिजवान सय्यद यांना मिळाली होती. त्या नुसार पोलिसांनी सापळा लावून दीडच्या सुमारास श्रीनिवास ला शिवाजी महाराज पुतळ्या जवळ उभ्या आसलेल्या श्रीनिवासला हटकले आसता तो पळून जाण्याचा तयारीत असताना मोठ्या शिताफीने त्याला पकडून 2000 रु सारख्या दिसणाऱ्या 10 लाख 74 हजार रुपयांच्या बनावट बनावट नोटा जप्त करून त्याला अटक केली या संदर्भात कळवा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Web Title: The fake notes of around ten lakhs were seized in mumbai kalwa