शाहरुखने पाकिस्तानला 45 कोटी रुपये दिले? नाही! हे खोटं आहे! 

Shahrukh Khan
Shahrukh Khan

मुंबई : 'पाकिस्तानमध्ये 2017 च्या गॅस गळतीच्या दुर्घटनेमध्ये 45 कोटी रुपयांची मदत करणारा शाहरुख खान आता पुलवामा हल्ल्यानंतर कुठे गायब झाला आहे', अशा आशयाची फेसबुक पोस्ट, ट्विट किंवा व्हॉट्‌सऍप मेसेज तुमच्या वाचनात आला असेल. हा खोडसाळपणा सोशल मीडियावरील काही युझर्सने सुरू केला आहे. 

काश्‍मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी देशभरातून अनेकांचे हात मदतीसाठी पुढे आले. या मदत करणाऱ्यांचं एकीकडे कौतुक होत असतानाच सोशल मीडियावरील काही युझर्सने अचानक अभिनेता शाहरुख खान याच्याविरोधात मोहीम सुरू केली. याला संदर्भ देण्यात आला तो एका जुन्या बातमीच्या व्हिडिओचा! 

'इंडिया टीव्ही'च्या 2017 मधील एका बातमीचा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केला जात आहे. विशेष म्हणजे, 'इंडिया टीव्ही'च्या त्या बातमीचा विषयच 'शाहरुखने खरोखरच पाकिस्तानला 45 कोटी रुपयांची मदत केली आहे का' असा होता. पण ती क्‍लिप एडिट करून व्हायरल केल्याने 'शाहरुखने पाकिस्तानला मदत केली' असा अर्थ प्रसारित केला गेला. 

याच व्हिडिओ क्‍लिपचा आधार घेत शाहरुखवर 'देशद्रोही' असल्याचा आरोपही अनेक सोशल मीडिया युझर्सने केला. यावर खुद्द शाहरुखने प्रतिक्रिया दिली नसली, तरीही सोशल मीडियावर अनेकांनी या व्हायरल व्हिडिओला प्रत्युत्तर दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com