कुटुंब रंगलंय स्वच्छता अभियानात

कुटुंब रंगलंय स्वच्छता अभियानात

तुर्भे -  देशभर सध्या स्वच्छता अभियानाचे वारे वाहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईतील एक अवलिया आपल्या कुटुंबासमवेत आपल्या व्हॅनद्वारे नवी मुंबईतील गल्लीन्‌ गल्ली फिरून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहे. विशेष म्हणजे त्याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

घणसोली, सेक्‍टर- ६ मधील मोहनराव जाधव, सुवर्णा जाधव हे दाम्पत्य आपली मुले शुभम व अथर्व यांच्यासह स्वतःच्या इको व्हॅनद्वारे गेल्या तीन महिन्यांपासून बेलापूरपासून ते दिघा परिसरात नागरिकांना स्वच्छतेचा महत्त्व पटवून देत आहेत. हे काम ते दररोज सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते नऊदरम्यान करत आहेत. या दाम्पत्याने त्यांच्या व्हॅनवर स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी पोस्टर चिकटवलेली आहेत. तसेच लाऊड स्पीकरद्वारे स्वच्छतेच्या गीतांची धून वाजवून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. हे कुटुंब जास्तीत जास्त लक्ष झोपडपट्टी परिसरात देत आहेत. या ठिकाणी जास्त करून कुटुंबे नोकरी करतात. अशा वेळी राष्ट्रीय मोहीम कोणती येते, याची त्यांना माहिती नसते; त्यामुळे इकडे जास्त लक्ष दिले जात असल्याचे सुवर्णा जाधव यांचे म्हणणे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com