लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ' वादाच्या भोवऱ्यात, वाचा काय आहे प्रकरण...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

मुंबई - 'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम माहित नाही असा कुणीही नसेल. मराठीतील सर्वात लोकप्रिय 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती सयाजीराव गायकवाड यांचा अपमान केल्याप्रकरणी हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचे फोटो एडिट करून त्याजागी भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचे फोटो महाराजांच्या रूपात दाखवल्याप्रकरणी आता सोशल मीडियावर संतापाची लाट पसरलीय. 

मोठी बातमी -  महाविकास आघाडीतील 'जोतिरादित्य सिंधीया'वर अजित पवार म्हणतात, आमच्यात...

याप्रकरणी स्वतः संभाजी राजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'चला हवा येऊ द्या' या मालिकेत राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप संभाजीराजेंनी केला आहे.  झी मराठीने आणि 'चला हवा येऊ द्या' चे लेखक आणि सूत्रसंचालक डॉक्टर निलेश साबळे यांनी जाहीर माफी मागावी असं राज्यसभा खासदार आणि महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांनी केलीये.   

काय म्हणालेत संभाजी राजे? 

मोठी बातमी - "माझ्या घोषणांमुळे महाराष्ट्रात महाराष्ट्रात कोरोनाचे कमी रुग्ण" - रामदास आवठवले

दरम्यान, याप्रकरणी 'झी मराठी' किंवा डॉक्टर निलेश साबळे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र टीव्ही रिपोर्टच्या माध्यमातून जी माहिती समोर येतेय त्यात, हे स्किट तुम्ही पुन्हा पाहू शकता, या स्किटमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा अनादर करण्यासारखं काहीही नाही, या स्किटमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा उल्लेखही त्यामध्ये नाही आणि या स्किटचा आशय देखील वेगळा असल्याचं, काही कलाकारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीये. दरम्यान झी मराठीकडून याबाबत कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. 

famous marathi serial chala hava yeu dya in controversy read full story

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famous marathi serial chala hava yeu dya in controversy read full story