ड्रग्स कनेक्शन प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवाला अटकेत

सुमित बागुल
Tuesday, 12 January 2021

एका ब्रिटिश नागरिकाच्या चौकशीदरम्यान 'मुच्छड पानवाला'चं नाव समोर आलेलं.

मुंबई : ड्रग्स प्रकरणी NCB ने म्हणजेच नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने मुंबईतील केम्स कॉर्नरवरील प्रसिद्ध 'मुच्छड पानवाला'ला अटक केली आहे. काल रात्री नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून ही कारवाई करण्यात आली आणि मुच्छड पानवाला याला बेड्या ठोकल्या गेल्यात.

सोमवारी मुच्छड पानवालाची सखोल चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुंबईत ड्रग्स प्रकरणी NCB मार्फत सातत्याने मोठ्या कारवाया करण्यात येत आहेत. अनेक सेलिब्रिटीज देखील नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आहेत. ड्रग्स कनेक्शन प्रकरणी काल झालेली कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जातेय.

Bird Flue in Mumbai |मृत कावळ्यांना लागण; कच्चे मांस आणि कच्ची अंडी न खाण्याचे आवाहन

मुच्छड पानवाला याचे अनेक बडे सेलिब्रिटीज ग्राहक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका ब्रिटिश नागरिकाच्या चौकशीदरम्यान 'मुच्छड पानवाला'चं नाव समोर आलेलं. याबरोबरच NCB मार्फत राहिला फर्निचरवाला आणि करण सजनानी यांची देखील चौकशी करण्यात आली होती. या दोघांकडे सापडलेला गांजा मुच्छड पानवाला पुरवत असल्याची बाब समोर आलेली. त्यानंतर NCB ने मुच्छडला चौकशीसाठी पाचारण केलं होतं. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोण आहे मुच्छड पानवाला ?

  • ‘मुच्छड पानवाला' याचं मुंबईत केम्स कॉर्नरवर पानाचे दुकान आहे.
  • ‘मुच्छड पानवाला' यांच्याकडे अनेक बडे असामी ग्राहक म्हणून येतात.
  • यामध्ये अनेक अभिनेते, अभिनेत्र्या तसेच क्रिकेट जगतातील व्यक्ती यांचा समावेश आहे. 
  • जयशंकर तिवारी असं 'मुच्छड पानवाला' चं संपूर्ण नाव आहे. 

famous Muchhad Paanwala from mumbai has been arrested by Narcotic control bureau

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: famous Muchhad Paanwala from mumbai has been arrested by Narcotic control bureau