राज्यातील शेतकऱ्यांचे पायदळ मुंबईत दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मुंबई - मराठवाडा, विदर्भ, सांगली- सातारा, नाशिक- जळगाव, ठाणे, पालघर...राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आदिवासी-शेतकऱ्यांच्या पायदळाने बुधवारी मुंबईवर धडक मारली. हजारोंच्या संख्येने मंगळवारी ठाण्यात आलेल्या या आबालवृद्ध मोर्चेकऱ्यांचे लक्ष्य आहे  विधिमंडळाचे अधिवेशन. या अधिवेशनावर उद्या मोर्चा धडकणार आहे. आश्‍वासनं न पाळल्याने मनात दाटलेला संताप; परंतु कृतीत मात्र संयम, असा हा मोर्चा मजल दरमजल करीत मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाला कोठेही धक्का न लावता आज सायंकाळी मुंबईत मुक्कामी दाखल झाला.   

लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा हा ‘लाँग मार्च’ निघाला आहे. ट्रक, रेल्वे, बस अशा मिळेल त्या वाहनाने हे हजारो आदिवासी- शेतकरी प्रथम ठाण्यात दाखल झाले. बुधवारी दुपारी त्यांनी ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून मुंबईच्या दिशेने कूच केले. पाठीस लटकवलेल्या पिशव्या, हातात बॅनर किंवा झेंडे, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोईवर टोपी किंवा मुंडासे असे हे मोर्चेकरी घोषणा देत महामार्गावरून मार्गक्रमण करत होते. सायंकाळी चुनाभट्टी परिसरात ते पोचले.

काही मागण्या
    उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. 
    वनाधिकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे जमिनीचे मालक करा. 
    शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा. 
    सरसकट दोन रुपये किलोने धान्य मिळावे. 
    बागायत जमिनीला हेक्‍टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान द्या.

Web Title: Farmer Agitation in Mumbai