अनुदानासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

Subhash-Deshmukh
Subhash-Deshmukh
मुंबई - खरीप हंगाम 2017-18 मध्ये तूर हरभऱ्याची हमीभावाने विक्री करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने एनसीडीईएक्‍स ई-मार्केट लि. या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र "नाफेड'ने खरेदी न केलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेतकऱ्यांनी अनुदानासाठी राज्य सहकारी पणन महासंघ आणि विदर्भ सहकारी पणन महासंघाकडे अर्ज केले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बॅंक खात्यास लिंक नसणे, आधार क्रमांक चुकीचा असल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आपली आवश्‍यक सर्व माहिती संबंधित जिल्हा पणन अधिकारी किंवा संबंधित खरेदी-विक्री संघाकडे सादर करावी, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com