रविवारी आझाद मैदानावर शेतकरी कामगार महापंचायत | Farmers mahapanchayat update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmers

रविवारी आझाद मैदानावर शेतकरी कामगार महापंचायत

मुंबई : शेतकरी आंदोलनाला (farmer strike) पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्च्याच्यावतीने (Farmers workers strike) आझाद मैदानात (Azad maidan) रविवारी (ता. 28) शेतकरी कामगार महापंचायत (Mahapanchayat) आयोजित करण्यात आली आहे. लखीमपूर खेरी येथे शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थीकलश (cremation urns) राज्यभरात मानवंदना देण्यासाठी फिरविण्यात आले असून ते महापंचायत संपल्यानंतर २८ नोव्हेंबरला संध्याकाळी गेट वे ऑफ इंडिया (Gate way of India Arabian sea) येथील समुद्रात विसर्जित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी धोरणांविरोधात सर्व डावे पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त संयुक्त शेतकरी कामगार महापंचायत आयोजित कार्नाय्त आली आहे.या महापंचायतीला मार्गदर्शन करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाचे राकेश टिकैत, डॉ. दर्शन पाल, यौद्धवीर सिह, हनान मोल्ला, अतुलकुमार अंजान, राजाराम सिह आदी राष्ट्रीय किसान नेते उपस्थित रहाणार आहेत.

केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष हे कायदे संसदेत मागे घेईपर्यंत तसेच शेतकरी, कामगार,विदयार्थी,अल्पसंख्याक, मागासवर्गीय अशा विविध समूहांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढण्याचा निर्धार करण्यासाठी ही महापंचायत होत आहे. 27 नोव्हेंबरला लखीमपूर खेरी इथे शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थीकलश मुंबईत आणण्यात येणार आहेत. 27 तारखेला दुपारी 12 वाजता हे अस्थीकलश शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आणण्यात येणार असून येथे महाराजांना अभिवादन केले जाणार आहे. एक वाजता चैत्यभूमी इथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येणार आहे.

त्यानंतर अस्थीकलश यात्रा परेल, केईएम हॉस्पिटल समोर स्वातंत्र्य आंदोलनातील शहीद बाबू गेनू यांच्या पुतळ्याला अभिवादन करेल. सायकांळी चार वाजता मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गांधीजींना अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर 27 तारखेची अस्थीकलश यात्रा स्थगित होईल. त्यानंतर 28 तारखेला संध्याकाळी महा पंचायत संपल्यावर हे अस्थीकलश हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात विसर्जित केले जाणार आहेत.

loading image
go to top