शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसानभरपाई हवी : थोरवे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

नेरळ: कर्जत तालुक्‍यातील भातशेती आणि अन्य प्रकारच्या शेतीच्या नुकसानीची नोंद शासनाने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के भरपाई दिली पाहिजे, अशी भूमिका आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे.

तालुक्‍यातील मांडवणे, आंबोट भागातील नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केल्यानंतर तसे आदेश तहसीलदारांना दिले. दरम्यान, नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे ४ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जातील, अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली आहे.

कर्जत तालुक्‍यात पावसाने भात, नाचणी, नागली आणि वरी या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकारीवर्गासह तालुक्‍यातील काही गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. मांडावणे, आंबोट भागातील शेतीची पाहणी करीत असताना तहसीलदार विक्रम देशमुख आणि तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे उपस्थित होते.

४ नोव्हेंबरपर्यंत होणार पंचनामे
नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर आमदार थोरवे यांनी तहसीलदार देशमुख यांना तालुक्‍यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाची मदत मिळाली पाहिजे, अशी सूचना केली. त्या वेळी माहिती देताना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत तालुक्‍यातील सर्व १० हजार हेक्‍टर शेतीचे पंचनामे केले जातील, असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना मिळणारी शासनाची मदत ही थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होईल, असे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers need 100% compensation: Thorway