भातपिकावर बगळ्या रोगाचे आक्रमण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

वाडा ः वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भातलावगड केली असून पीकसुद्धा चांगले आले होते; मात्र पावसाच्या संततधारेमुळे उशिरा लागवड केलेल्या भातावर मोठ्या प्रमाणावर बगळ्या रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले भातपीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने काही शेतकऱ्यांनी उशिराने भात लागवड केली; मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने भातरोपे बरेच दिवस पाण्यात राहिल्याने कुजून गेली आहेत; तर काही भातरोपांवर बगळ्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. बगळ्या रोग आटोक्‍यात आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी विविध प्रकारची औषधांची फवारणीही केली आहे; मात्र हा रोग आटोक्‍यात आलेला नाही. या रोगाने वाडा तालुक्‍यातील मौजे पिक येथील सचिन पंढरीनाथ पाटील, नारायण परशराम पाटील या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

पंचनाम्यानंतरही भरपाईस विलंब
वाडा तालुक्‍यात महिनाभरापूर्वी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भातपिकाचे नुकसानीचे पंचनामे झाले आहेत; मात्र हे पंचनामे होऊन महिना झाला, तरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने ही नुकसानभरपाई मिळेल की नाही, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता भातपिकावरील बगळ्या रोगाने पोखरले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in the Wada worried; Continuous rains