शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊनच काम - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

शहापूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग महाराष्ट्राला 20 वर्षे पुढे नेणारा आहे. ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून, त्यांना विश्‍वासात घेऊन मगच त्याचे काम हाती घेऊ. त्यांनी सुचवलेल्या पर्यायी मार्गाचा विचार करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी येथे दिले.

कोकण विभागीय कुणबी मेळाव्याच्या समारोपप्रसंगी फडणवीस बोलत होते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्‍यातील नागरिकांना पाणी मिळत नाही हे भयंकर आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आमदार बरोरा यांनी सुचविलेल्या भावली धरण पाणी योजनेसाठी 200 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. जो तालुका दुसऱ्या शहराला पाणी पुरवेल, त्या तालुक्‍याला पाणी पुरविण्याची जबाबदारी त्या शहराची राहील, असा नियमच करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय करण्यात येणार आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी या वेळी केली.

Web Title: Farmers work keeping the faith