एक उपवास... अन्नदात्यासाठीही!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

‘सकाळ’च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई - कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या  सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर करणाऱ्या आपल्या अन्नदात्याविषयी सहवेदना दर्शवण्यासाठी नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, या ‘सकाळ’ने केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, नोकरदार, गृहिणींपासून सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येक स्तरातील व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या काही व्यक्तींची यादी आम्ही आजच्या अंकात पान दोनवर प्रसिद्ध  करत आहोत.

हवा तुमचाही सहभाग!
आजवर तुम्ही या ना त्या देवासाठी उपवास केला असेल; पण अन्नदात्यांच्या वेदनांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि सरकारपर्यंत शेतकऱ्यांची हाक पोचवण्यासाठी ‘सकाळ’ने या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दर्शवला आहे. तुम्हीही त्यात सहभागी होणार असाल तर तुमचे नाव, वय, राहण्याचे ठिकाण तसेच व्यवसायाची माहिती आम्हाला ८८८८८०९३०६ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर पाठवा. एक संवेदनशील व्यक्ती म्हणून तुम्हीही त्यात नक्कीच सहभागी व्हाल, ही अपेक्षा!

प्रतीक्षा लोणकर - कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाय आहे असे मला वाटत नाही. 

उपेंद्र लिमये - कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी आत्महत्या हे त्यावरचे उत्तर असू शकत नाही. स्ट्रगल हा प्रत्येक क्षेत्रात आहे. त्यावर मात करणे महत्त्वाचे आहे. 

Web Title: fasting farmer issue