ठाण्यात घरांसाठी उपोषणाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

ठाणे - ठाणे महापालिका विविध प्रकल्प योजनेच्या कारणांनी घरमालकांवर कारवाई करत आहे. रहिवाशांचे पुनर्वसन करण्यातही पालिका अपयशी ठरत आहे. मुळात १९९५ पूर्वीच्या रहिवाशांची घरे संरक्षित केली असून त्यांचे कायमस्वरूपाचे हक्काचे पुनर्वसन केल्याशिवाय ती निष्कासित करू नयेत, असा राज्य सरकारचा निर्णय असूनही रहिवाशांना न्याय मिळाला नाही, तर येत्या ४८ तासांत बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा निवारा हक्क समन्वय समितीचे मुख्य समन्वयक ॲड. किशोर दिवेकर यांनी दिला.

सोमवारी गडकरी कट्टा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासाच्या नावाखाली ठाण्यात बिल्डरधार्जिण्या योजना राबविल्या जात आहेत. योजना राबवायच्याच असतील, तर सर्वप्रथम घरमालकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. रहिवाशांना न्याय दिला नाही, तर समितीचे पदाधिकारी बेमुदत उपोषण करतील, असेही दिवेकर यांनी सांगितले. रस्तारुंदीकरणामुळे कित्येक वर्षांपासून रेंटलमध्ये राहणाऱ्यांना त्यांच्या मालकी हक्काची घरे द्यावीत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

Web Title: Fasting for houses in TMC