टोलमुक्तीसाठी कोपरीवासीयांचे लाक्षणिक उपोषण

The fasting of the Kopar people for toll free
The fasting of the Kopar people for toll free

ठाणे - 'विरोधी पक्षात असताना टोल बंद करण्याच्या वल्गना करणारे आता सरकारमध्ये आहेत. तरीही टोलधाड सुरूच आहे,' असे म्हणत 'टोल लूटमार बंद करा' अशा घोषणा टोल संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कोपरीवासीयांनी दिल्यात. त्यांनी पुर्वद्रुतगती महामार्गावरील आनंदनगर वेशीवर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.

ठाण्यातील भाजपचे कोपरीतील नगररसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडून चक्क भाजप सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. या आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात घोषणादेखील देण्यात आल्या असून पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल देखील करण्यात आला आहे. राज्यात भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते मात्र चार वर्ष पूर्ण  होऊनही ठाणे जिल्ह्याजवळ टोलनाके अद्याप सुरु आहेत. हाकेच्या अंतरावरील हरी ओम नगरच्या रहिवास्यांना टोलमुक्ती मिळते मग, कोपरीकरांना का नाही ? असा सवालही उपोषणकर्यानी केला.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com