विधी अभ्यासक्रमात मराठीला प्रथम दर्जा हवा

Marathi-language
Marathi-language

मुंबई - विधी अभ्यासक्रमात मराठी भाषेला प्रथम दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्‌स लॉ संघटनेने मुंबई विद्यापीठाच्या विरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सोमवारी (ता. ८) कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनाच्या आवारात संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे. जोवर मागणी मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशाराही संघटनेने विद्यापीठाला दिला आहे.

विधी अभ्यासक्रमातील मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) आणि बीएलएस या शाखेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबरोबर मराठी भाषेतसुद्धा मिळणे बंधनकारक करावे. तसेच एलएलएमची पूर्वपरीक्षा मराठी भाषेतून घेण्यात यावी आणि परीक्षेचे ६०:४० पद्धतीचे परिपत्रक रद्द करावे, या मागणीसाठी संघटनेने आंदोलन केले होते. तसेच कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती; परंतु कुलगुरूंनी संघटनेच्या मागण्यांना केराची टोपली दाखवल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com