प्रेम प्रकरणाच्या संशयातून बापाने मुलीला जिवंत जाळले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

नालासोपारा - प्रेम प्रकरणाच्या संशयातून जन्मदात्या पित्यानेच 16 वर्षीय मुलीला जिवंत जाळल्याचा प्रकार विरार पूर्वेतील गोचरपाडा येथे सोमवारी (ता. 31) घडला. यात मुलगी 70 टक्के भाजल्याने तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहम्मद मूर्तिजा मंसूरी असे आरोपी बापाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सोमवारी दुपारी मुलगी फोनवर बोलत असताना मोहंमद याला आपल्या मुलीच्या बोलण्यावरून संशय आला. तिचे प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या रागातून त्याने तिचा फोन काढून घेत जमिनीवर जोरात आपटला. यानंतर रॉकेल अंगावर ओतून आपल्याला पेटवून दिल्याचे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे. 

Web Title: father burned the girl in suspicion of love affair