पित्यानेच काढला मुलीच्या प्रियकराचा काटा

दीपक शेलार
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मृतक सुरेंद्र मिश्रा (26) रा. कोपरी, ठाणे हा खाजगी कंपनीत कमला होता. त्याचे दुबईत अभियंता असलेल्या राजेंद्र तिवारी यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनिही पळुन जाऊन लग्न केले याचा राग मनात धरून राजेंद्र तिवारी यांनी त्यांचे सहकारी आरोपी भास्कर नारिंगकर आणि रवी चौधरी यांच्या सहाय्याने काटा काढण्याचे ठरविले. लग्नानंतर घर पाहण्याच्या बहाण्याने या आरोपीनी सुरेंद्रला बोलावून दारू पाजली आणि धावत्या लोकलमधून ढकलून दिले. दरम्यान सुरेंद्र घरी आला नसल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिस ठाण्यात केली.

ठाणे : दुबईत अभियंता असलेल्या उच्चशिक्षित बापाने सहकाऱ्याच्या मदतीने आपल्या मुलीचा प्रियकर सुरेंद्र मिश्रा याचा काटा काढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलीच्या प्रियकराला मद्य पाजून मरेपर्यत मारहाण करीत धावत्या लोकलमधून फेकल्याचा पर्दाफाश नौपाडा पोलिसांनी केला असुन मुलीच्या बापासह त्रिकुटाला गजाआड केले. तर, एकास उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. अधिक तपास नौपाडा पोलीस करीत असुन प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनीट 1 कडे सोपवला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

मृतक सुरेंद्र मिश्रा (26) रा. कोपरी, ठाणे हा खाजगी कंपनीत कमला होता. त्याचे दुबईत अभियंता असलेल्या राजेंद्र तिवारी यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनिही पळुन जाऊन लग्न केले याचा राग मनात धरून राजेंद्र तिवारी यांनी त्यांचे सहकारी आरोपी भास्कर नारिंगकर आणि रवी चौधरी यांच्या सहाय्याने काटा काढण्याचे ठरविले. लग्नानंतर घर पाहण्याच्या बहाण्याने या आरोपीनी सुरेंद्रला बोलावून दारू पाजली आणि धावत्या लोकलमधून ढकलून दिले. दरम्यान सुरेंद्र घरी आला नसल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी नौपाडा पोलिस ठाण्यात केली.

सदर हत्येनंतर आरोपी राजेंद्र तिवारी दुबईत पळून गेला. तर दोघे आरोपी भूमिगत झाले. तर रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या सुरेंद्र याची ओळख न पटल्याने शासकीय नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या बेपत्ता तक्रारीचा शोध घेताना तांत्रिकदृष्ट्या तपासात मोबाईलवर आलेल्या कॉलचा शोध घेत नौपाडा पोलिस आरोपी भास्कर नारिंगकर आणि रवी चौधरी यांच्यापर्यंत पोहचले. दोघांना अटक केल्यानंतर खुनाला वाचा फुटली. दरम्यान दुबईत पळून गेलेल्या राजेंद्र तिवारी याला पोलिसांनी खाक्या दाखवून दुबईतून बोलावून घेतले आणि सोमवारी मुंबईत विमानतळावर उतरताच अटक केली. चौकशी घडलेला प्रकार सांगताच पोलिसही थक्क झाले. मुलीच्या प्रेमाला विरोध असल्याच्या कारणावरून तिच्या प्रियकराचा काटा काढण्याचे ठरले आणि हत्या करण्यात आल्याचे तपासात आणि चौकशीत समोर आले. नौपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून अधिक तपास करीत आहेत.

Web Title: father killed daughters boyfriend in Thane