एफडीएच्या 428 अधिकाऱ्यांना टॅबवाटप 

एफडीएच्या 428 अधिकाऱ्यांना टॅबवाटप 

मुंबई  - अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीनुसार एफडीएच्या राज्यातील 428 अधिकाऱ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले आहे. त्यासाठी 48 लाख खर्च करण्यात आले आहेत. या टॅबमुळे अधिकाऱ्यांचे काम सुलभ होऊन एफडीएचा कारभारही गतिमान होणार आहे. 

अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या दुकाने, गोदामांच्या तपासण्या, दुकानदारांकडून करण्यात येणारे कायद्याचे उल्लंघन आदींची माहिती अधिकाऱ्यांना देण्यासाठी हे टॅब उपयुक्त ठरणार आहेत. एफडीएच्या अन्न व औषध विभागाचे अधिकारी विविध कारवायांसाठी कार्यालयाबाहेर असतात. दरम्यान, होणाऱ्या कारवाईची माहिती त्यांना तातडीने कार्यालयाला कळवता येणार आहे. तसेच कार्यालयातील सर्व माहिती या टॅबमध्ये सेव्ह करता येणार असल्याने अधिकाऱ्यांना कोणत्याही ठिकाणाहून प्रशासनाची कामे करता येणार आहेत. एफडीएचा कारभार यापूर्वीच ऑनलाईन सुरू झाला आहे आणि व्यावसायिकांना ऑनलाईन परवाने देण्यात येत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com