म्हाडाच्या उपहारगृहाला एफडीएची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

वांद्रे येथील म्हाडा कार्यालयाच्या उपहारगृहाला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नुकतीच धडक मारली. उपहारगृहात स्वच्छता पाळली जात नसल्याने अन्नपूर्णा केटरिंग सर्व्हिसेस या उपहारगृहाचे काम पाहणार्‍या केटरिंग कंपनीला एफडीएने नोटीस धाडली अाहे.
 

मुंबई - वांद्रे येथील म्हाडा कार्यालयाच्या उपहारगृहाला अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नुकतीच धडक मारली. उपहारगृहात स्वच्छता पाळली जात नसल्याने अन्नपूर्णा केटरिंग सर्व्हिसेस या उपहारगृहाचे काम पाहणार्‍या केटरिंग कंपनीला एफडीएने नोटीस धाडली अाहे.

एफडीएच्या अन्न विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हाडाच्या उपहारगृहाला 1 ऑगस्ट रोजी भेट दिली. म्हाडाच्या तळमजल्यावर अन्नपूर्णा केटरिंग सर्व्हिसेसचे उपहारगृह अाहे. एफडीएच्या अधिकार्‍यांनी तब्बल तीन तास उपहारगृहाची व तेथील अन्नपदार्थांची तपासणी केली. स्वंयपाकगृह अस्वच्छ अाढळल्याने एफडीएने उपहारगृहाला नोटीस धाडल्याची माहिती एफडीएच्या अन्न व औषध विभागाचे सहअायुक्त शैलेश अाढाव यांनी दिली.

किचनमधील दही व बेसन अादी पदार्थ तपासणीसाठी घेतले असून त्याचा अहवाल प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: FDA notice to Mhadas cantine