अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई, वांद्र्यातून 1 लाख 44 हजार रुपयांची सुगंधी सुपारी जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई, वांद्र्यातून 1 लाख 44 हजार रुपयांची सुगंधी सुपारी जप्त

मुंबई, 10: वांद्रे टर्मिनस येथे 10 डिसेंबरला सकाळी पाच वाजता अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) तब्बल दीड लाख रुपये किंमतीची सुगंधित सुपारी जप्त केली. या प्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुय्यम दर्जाच्या तेलाची साठवणूक केल्याप्रकरणी एफडीएकडून काही दिवसांपूर्वी शहरात विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली होती.

राज्यामध्ये गुटखा, सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू या अन्न पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. असे असतानाही वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे गुरुवारी सुगंधित सुपारी विकली जात असल्याची माहिती एफडीए कार्यालयाला मिळाली. त्यानुसार, एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी बुधवारी रात्रीपासून वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे सापळा रचला.

गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास यासीन हसन शेख ही महिला हातगाडीवरून काही माल आणत असल्याचे दिसली. या मालाची पाहणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित असलेली बनारसी आशिक सुगंधित सुपारीचे 3,600 पॅकेट आढळून आले. या मालाची किंमत जवळपास 1 लाख 44 हजार इतकी आहे. या साठ्यातील काही नमूने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून, उर्वरित साठा जप्त करण्यात आला. संबंधित व्यक्तीविरोधात निर्मल नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गौ.सु.जोशी, रा.दि.पवार, व्हि.एस. निकम, ध.वि.आघाव व सहाय्यक आयुक्त अश्निवी रांजणे यांनीही कारवाई केल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शशिकांत केंकरे यांनी दिली.

FDA seized scented guthkha and supari worth more than one lac forty four thousand

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com