मुरबाड : डेंग्यूच्या साथीच्या अफवेने घबराट 

मुरलीधर दळवी
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मुरबाड : किशोर गावामध्ये ताप व रक्तातील प्लेटलेट कमी असणारे रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र किशोर गावातील 10 लोकांच्या रक्ताचे नमुने ठाणे येथे तपासणीसाठी पाठवले असता फक्त एक रक्ताच्या नमुन्यात डेंग्यूचे जंतू आढळले असल्याने डेंग्यूची साथ नसल्याचे किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ माधव कावळे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाने किशोर गावामध्ये तपासणी सुरु केली आहे तसेच गुरुवारी रात्री गावामधील डास पकडून तपासणीसाठी पाठवले आहेत. ग्रामपंचायतीने परिसर स्वच्छता तसेच धूर फवारणी केली असून शुक्रवारी कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे.

ठाणे जिल्ह्यापरिषदेचे उपाध्यक्ष सुभाष दादा पवार व जिल्हापरिषद सदस्य प्रजक्ता भावार्थे यांनी गुरुवारी (ता. 20) किशोर गावास भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशी औषधे व कर्मचारी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले त्यांचे सोबत सरपंच जानू गायकर सामाजिक कार्यकर्ते मोहन भावर्थ व बलिराम अगिवले बाजार समिती संचालक अॅड. अजय चौधरी उपस्थित होते.

रक्तातील प्लेटलेट फक्त डेंग्यूमुळेच कमी होतात हा लोकांचा गैरसमज आहे. इतरही कारणाने त्या कमी होऊ शकतात खाजगी लॅबप्रमाणे किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्त नमुने तपासण्याची व प्लेट लेट वाढण्यासाठी औषधोपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे डॉ. माधव कावळे यांनी सांगितले व लोकांनी घाबरू नये असे आवाहन केले.

Web Title: fear because of rumors of dengue