esakal | 'सत्ताधाऱ्यांनाच सतावतीये सरकार पडण्याची भीती'; प्रवीण दरेकर यांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

'सत्ताधाऱ्यांनाच सतावतीये सरकार पडण्याची भीती'; प्रवीण दरेकर यांचा टोला

राज्यातील सरकार पाडून दाखवा... पाडून दाखवा... असे सत्ताधारी नेते म्हणत आहे. कारण त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे.

'सत्ताधाऱ्यांनाच सतावतीये सरकार पडण्याची भीती'; प्रवीण दरेकर यांचा टोला

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई ः राज्यातील सरकार पाडून दाखवा... पाडून दाखवा... असे सत्ताधारी नेते म्हणत आहे. कारण त्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे. म्हणजे त्यांनाच स्वत:ला सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटत असावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे. 

हेही वाचा - '...अन्यथा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू'; रस्ते दुरवस्थेवरून शिवसेना खासदार आक्रमक

सरकार पाडतो, असे कोणीही म्हणत नाही, ऑपरेशन लोटस हा शब्दही कोणी उच्चारत नाही. तरीही ऑपरेशन लोटसमुळे आम्हांला खरचटलेही नाही, असे सत्ताधारी सांगतात. भाजपने खरंच काही करायचे ठरवले तर खरचटणे सोडाच, पण रक्तबंबाळ व्हाल, असा इशाराही त्यांनी दिला. थडगी उकरून काढण्याची भाषा शिवसेनानेते संजय राऊत करीत आहे, पण बोलायाला केव त्यांनाच येते, असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते, मग थडगी काय आणि दुसरे काय, सर्वांचाच पर्दाफाश करता येईल. त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करु नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - चोपड्यापूजन आता केवळ नावापुरते; बदलत्या युगामुळे संगणकाचे महत्त्व वाढले

सरकारने एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचे नेते स्वतःची पाठ थोटपून घेत आहेत, मात्र वर्षभरात सरकारने भरीव असे काहीच केले नाही. सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही, शेतकरी अतिवृष्टीने हैराण आहे. कोकणात निसर्गग्रस्तांना मदत नाही, कामगार बेजार आहे, बेरोजगारी मिटविण्यासाठी कंपन्यांशी करार करतात, मात्र प्रत्यक्षात काही होत नाही. आजही कोविड नियंत्रणात आणू शकत नाही. मग वर्ष पूर्ण केल्याच्या गमजा मारण्याला काय अर्थ आहे? असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला आहे. 

Fear of government being overthrown by those in power Praveen Darekars criticism

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image