esakal | माथेरान घाटात दुर्घटनेची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

माथेरान घाटात दुर्घटनेची भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेरळ : पावसाळ्यात नेरळ-माथेरान (Neral) (Matheran) घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळते. अजूनही हा धोका कायम आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांचा बळी जाण्याची प्रतीक्षा करत आहे का, असा प्रश्न नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी केला आहे.

माथेरानमध्ये १२ महिने पर्यटन व्यवसाय बहरलेला असतो; परंतु या स्थळाकडे जाण्यासाठी असलेल्या माथेरान घाट मार्ग सध्या दरडींच्या घटनांमुळे धोकादायक झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग अपघाताला निमंत्रण देणारे दगड बाजूला करण्याची कार्यवाही करत नाही. याबद्दल माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी बांधकाम विभाग नागरिकांचा बळी जाण्याची प्रतीक्षा करत आहे काय, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

हेही वाचा: Sakinaka Case: नक्की काय घडलं याबाबत अनभिज्ञ आहोत- मुंबई पोलिस आयुक्त

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता (प्रभारी) अक्षय चौधरी यांनी सांगितले की, नेरळ-माथेरान घाटरस्त्यात दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात घडल्या आहेत. डोंगरातून माती | सोबत आलेले दगड हे काही प्रमाणात रस्त्यावर तर काही डोंगरात अडकून पडले आहेत. ते दगड खाली आणण्यासाठी आपत्कालीन उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी आम्ही 'व्हीजेटीआय' संस्थेला पत्र पाठवले आहे. त्यांचे पथक हे दगड कसे काढायचे यावर निर्णय घेणार आहे.

loading image
go to top