शुल्कवाढीविरोधात न्यायालयात दाद मागणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई - शुल्कवाढीविरोधात आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर आता पालक आणि सामाजिक संघटना न्यायालयात दाद मागणार आहेत.

मुंबई व जवळपासच्या तीन शाळांविरोधात दोन आठवड्यांपूर्वी "फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन' या सामाजिक संस्थेकडे तक्रार आली होती. नंतर तब्बल 22 शाळांविरोधात तक्रारी संस्थेकडे आल्या.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या भेटीनंतर पालकांनी आझाद मैदानात आंदोलन केले. पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आझाद मैदानातील बेमुदत उपोषण एकाच दिवसात आटोपते घ्यावे लागले. यानंतर पालकांनी न्यायालयात दाद मागण्याचा निश्‍चय केला आहे. या संदर्भात 1 मे रोजी पालकांची बैठक होणार आहे.

32 शाळांविरोधात आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत, असे फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशन या संस्थेचे अध्यक्ष जयंत जैन यांनी सांगितले. बहुतांशी शाळांनी आपापल्या शाळांच्या संकेतस्थळावरून विशिष्ट ब्रॅण्डच्या कंपन्यांचे साहित्य ऑनलाईन अमुक तारखेपर्यंत खरेदी करण्याची सक्ती केली आहे. गणवेश, वह्या विशिष्ट कंपन्यांच्याच हव्यात, ही खरेदी ऑनलाईन करावी, असा आदेश शाळांनी दिला आहे.

Web Title: fee increase oppose in court