बोर्डी - उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान

अच्युत पाटील
बुधवार, 4 एप्रिल 2018

बोर्डी : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्याच्या कोसबाड हिल येथील अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेतून चालविल्या जाणाऱ्या नूतन बाल शिक्षाण संघातर्फे गुरूवार दिनांक 19 एप्रिल कै. ताराबाई मोडक यांच्या जयंतीचे औचित्य साधून संस्थेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंना सन्मानित करण्यात येणार आहे.

पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाराष्ट्र हायस्कूल क्र.2 सिद्धिविनायक हॉल मुंबई (दादर) पश्चिम येथे गुरूवारी (ता. 19) सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा विजया वाड व सोमय्या कला व वाणिज्य कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख विणा सोनकर उपस्थित राहतील व त्यांच्या शुभहस्ते संस्थेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर,सचिव दिनेश पाटील,कार्यकारी विश्वस्थ प्रकाशकरंदिकर यांनी केले आहे.

Web Title: felicitation of honorable personalities