महिला कर्मचाऱ्यांना सीईओच्याच नावाने अश्‍लील संदेश ; पगारवाढ देत नसल्यामुळे अभियंत्यानेच केला प्रताप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आरोपीला चांगली पगार वाढ देत नसल्याच्या रागाने त्याने हा प्रकार केला आहे. त्यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

मुंबई : कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीच्या साह्याने कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना अश्‍लील संदेश पाठवणाऱ्या 38 वर्षीय अभियंत्याला घाटकोपर पोलिसांनी नुकतीच अटक केली. राकेश देशाई असे त्याचे नाव आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आरोपीला चांगली पगार वाढ देत नसल्याच्या रागाने त्याने हा प्रकार केला आहे. त्यासाठी एका सॉफ्टवेअरचा वापर केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

याप्रकरणी सीईओने घाटकोपर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांच्या मोबाईल क्रमांक व ई-मेलचा वापर करून कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना अश्‍लील संदेश येत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी 17 मार्चला गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी संबंधित संदेशांची माहिती घेतल्यावर ते विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने पाठवल्याचे समजले. या सॉफ्टवेअरच्या साह्याने पाठवलेला संदेश विशिष्ट मोबाईल क्रमांक अथवा ई-मेलवरून पाठवण्यात दाखवू शकतो. त्यानंतर पोलिसांनी या संदेश पाठवण्यासाठी वापरलेल्या खऱ्या मोबाईल क्रमांकाची तसेच ई-मेल आयडीची माहिती मिळवली.

त्यावरून आरोपी अभियंत्याची ओळख पटली. चौकशी केल्यानंतर त्याने कमी पगारवाढ मिळत असल्यामुळे आपणच हा प्रकार केल्याचे सांगितले. त्याने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सध्या काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसह माजी कर्मचाऱ्यांनाही असे संदेश पाठवले आहेत. 

Web Title: female Employee CEO name message for Increments