नॅशनल पार्क: मादी बिबट्याचा वृद्धापकाळाने मृत्यू 

नेत्वा धुरी  
रविवार, 21 मे 2017

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील राधा या मादी बिबट्याचा शनिवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने मृत्यू झाला. यंदाच्या वर्षात तीन पिंज-यातील प्राणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने गमावले आहेत. 

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील राधा या मादी बिबट्याचा शनिवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने मृत्यू झाला. यंदाच्या वर्षात तीन पिंज-यातील प्राणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने गमावले आहेत. 

राधा ही सतरा वर्षीय मादी बिबट्या गेल्या तीन आठवड्यांपासून आजारी होती. महिन्याभरापासून वृद्धापकाळाने चालायलाही त्रास होत होता. गेल्या दोन आठवडयांपासून तिला चालायला प्रचंड त्रास होऊ लागला होता. मात्र शनिवारी रात्री साडे अकरा वाजता तिची प्राणज्योत मालावली. याअगोदर कृष्णा नावाची मादी बिबट्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. त्यानंतर उद्यानातील एकमेव भेकरही न्यूमोनियामुळे दगावले गेले. दरम्यान, कृष्णा या मादी बिबट्याची टॅक्सीडर्मी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

बिबट्याचा नव्हे, वाघाचा मृ्त्यू 
प्राण्यांच्या मृत्यूबाबत उद्यान प्रशासन गेल्या कित्येक वर्षांपासून गोंधळलेले असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी बिबट्याचा नव्हे तर वाघीणीचा मृ्त्यू झाल्याची माहिती उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी दिली. प्रत्यक्षात मादी बिबट्याचा मृत्यू होऊन चौदा तास उलटूनही उद्यानात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा त्यांना पत्ता नव्हता. 

Web Title: Female Leopard dies