कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद : बनसोड

कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद : बनसोड

कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राला मुहूर्त कधी लागणार? असा सवाल वारंवार विचारला जात आहे. मात्र, या ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळू शकला नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे माहिती अधिकारी लीलाधर बनसोड यांनी दिली.

2010 मध्ये या उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. 9 वर्ष लोटल्यानंतरही याठिकाणी उपकेंद्राचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झाले नसल्याने विद्यार्थी संघटना, राजकारणी तसेच सामान्य नागरिकांकडून विद्यापीठाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले जात आहे. सध्या या उपकेंद्रातून आयडॉल स्टडी मटेरियलचे वाटप करण्यात येते.

मागील वर्षी या उपकेंद्रातील स्कूल ऑफ इंजीनियरिंग मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती बनसोड यांनी दिली. 14 एप्रिल 2010 रोजी या उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. याला 9 वर्ष लोटल्यानंतरही उपकेंद्राचे काम सुरू न झाल्याने तत्कालीन महापौर रमेश जाधव यांनी विद्यापीठाला खरमरीत पत्र लिहित हे उपकेंद्र कधी सुरू होणार? अशी विचारणा केली होती. याठिकाणी उपकेंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या नावाचा फलकही या ठिकाणी लागला आहे. परंतु या उपकेंद्राचे अधिकृत उदघाटन अद्यापही करण्यात आलेले नाही. विद्यापीठाच्या बहुतांश सेवा ऑनलाइन पुरवल्या जात असल्या तरी काही विद्यार्थ्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्यापीठाने ठाणे उपकेंद्रात सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु ही सुविधा अद्याप कल्याण उपकेंद्रामार्फत पुरविण्यात येत नाही. 

मागील वर्षी जून-जुलै महिन्यात विद्यापीठाने जाहीर नोटीस द्वारा कल्याण उपकेंद्रातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. परंतु या प्रक्रियेस आवश्यक त्या  संख्येत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी हा अभ्यासक्रम या उपकेंद्रात सुरू करणे शक्य झाले नव्हते. दरम्यानच्या काळात विद्यापीठाने स्टडी मटेरियल वाटपाचे केंद्र या ठिकाणी सुरु केले. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षातही स्कूल ऑफ इंजीनियरिंगच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अवलंबली जाईल, अशी माहिती बनसोड यांनी दिली. 

कल्याण पासून कर्जत, कसारा, वाडा, मुरबाड, शहापूर या परिसरातील विद्यार्थ्यांना कल्याणच्या उपकेंद्राचा लाभ घेता येईल, या उद्देशाने हे उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले होते. परंतु विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे हे उपकेंद्र सुरु होण्यास विलंब होत गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com